बांबूची फुले- आनंदाचे डोही दुःखाचे तरंग!

7 May 2011 at 01:23

बांबू बद्दल लिहावे तेव्हढे थोडेच! जगाच्या कानाकोप-यात आढळणारी एक वनस्पती! वृक्षाच्या जंगलाच्या कित्येक पटीने वातावरणातील कार्बन शोषून घेणारी जीवउत्पत्ती! वादळ वाऱ्यात वाकेल पण मोडणार नाही या बाण्याने जगणारा एक जीव! जगात सर्वात जास्त म्हणजे दिवसाला ३ फूट वाढणारे झाड! चुकले.. बांबू वृक्ष नसून एक गवत आहे! बांबूचा अगदी जन्मापासून मृत्युपर्यंत उपयोग होतो! बाळ जन्मल्याबरोबर त्याला पारड्यात ठेवतात तर मृत्युनंतर बाम्बूच्याच तिरडीवर नेतात. बांबू पासून शिल्प, शोभेच्या वस्तू, भांडी, खाण्याचे पदार्थ, बांधकाम, मंडप, कपडे, कागद, छपराचे पत्रे, प्लायवूड आणि अगदी स्यनिटरी नपकीन बनविल्या जातात. मी बांबूला लोखंडी बार ऐवजी कॉंक्रेट मध्ये वापरलेत. असा हा बहुगुणी बांबू! भारतात जवळपास सर्व राज्यात बांबू आढळतो. बांबूचे आयुष्य ४५ ते १२० वर्षाचे आहे. बांबू बुडातून कापला की ४-५ वर्षात पूर्ण मोठा होतो. अशाप्रकारे बांबू एक रीनोवेबल बायो प्रोडक्ट आहे. बांबूला ४५ ते १२० वर्षाने फुले येतात. एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी लावलेल्या एका जातीच्या सर्व बांबूला एकाच वेळी फुले येतात. आणि आचर्याची गोष्ट म्हणजे की फुले आले की बांबूची झाडे उन्मळून पडतात आणि सार जंगल एकाचवेळी साफ होते.

अशी बांबूची फुले बघण्याचे भाग्य आणि तेच बांबू उन्मळून पडताना बघण्याचे दुर्देव्य मला लाभले!

नागपूरच्या शासकीय तंत्रनिकेतनाच्या परिसरात बांबूचे बन आहे. त्यांना फुले आलेली २०११ साली बघायला मिळाली. त्याचे छायाचित्र खाली दिलेले आहे.

bamboo flowerbamboo die

फुले आल्यावर बांबू कसे उन्मळून, तुटून पडतात त्याचे चित्र वर दिलेले आहे. अधिक चौकशी करता हा योग ४५ वर्षानंतर आल्याचे कळले

या कुतुहलाचे अद्याप निच्छित कारण कळलेले नाही. मात्र फुलो-या करिता बांबूच्या पेशीतील सारी शक्ती फुलांकडे एकवटली जाते आणि बांबू कामजोर होवून तुटून पडतात.पुढे जमिनीवर पडलेल्या नवीन फुलांपासून नवीन बांबूची रोपे तयार होतात. म्हणजे नवीन जीवाला जन्म द्यायला जुने मृत्यूला कवटाळतात!

बांबूला फुले आलेत की ती येणाऱ्या संकटाची चाहूल समजतात कारण त्यानंतर मोठा दुष्काळ पडतो व रोगराई पसरते. उत्तर पूर्वेला बांबूला फुले माणसाच्या वाईट कृत्यामुळे आणि देवाच्या कोपामुळे येतात असे समजल्या जाते. एकाचवेळी संपूर्ण बांबूच्या जंगलाला फुले येतात आणि सारे जंगल साफ होते.

खरे वैज्ञानिक कारण यामागे असे आहे- बांबूची फुले जमिनीवर पडतात त्यावर जीव जंतू, उंदीर घुशी वाढतात, या उंदीर घुसी रोगजंतू पिके खावून टाकतात त्यामुळे दुष्काळ पडतो तसेच रोग राई पसरते, उन्दरामुळे प्लेग, टायफाइड या सारखे रोग पसरतात.

अशा अनेक गोष्टी बांबूच्या आहेत! पुढील वेळी पुढील गोष्ट!

 

1 thought on “बांबूची फुले- आनंदाचे डोही दुःखाचे तरंग!

Leave a comment